नागपूर : गुंड पप्पू मिश्राच्या छेडछाडीनं महिला हैराण

November 16, 2015 9:15 PM1 commentViews:

sadasdasy

16 नोव्हेंबर : नागपूरमध्ये प्राध्यापकाला त्रास देणारा भाजपचा गुंड सुमित ठाकूरवर कारवाई होऊन काही दिवसच झाले असताना आणखी एक अशीच बातमी आलीय. हा गुंडसुद्धा भाजपचाच पदाधिकारी आहे. नाव आहे अखिलेख ऊर्फ पप्पू मिश्रा… खंडणी, जुगार यासारख्या गुन्ह्यांमध्ये जेलमध्ये जाऊन आलेला या पप्पूचा स्थानिक महिलांना अतोनात छळ सहन करावा लागतोय. महिलांची छेडछाड करणं, त्यांच्यासमोर अश्लिल शिवीगाळ करणं यामुळे महिलांना घराबाहेर पडणंही कठीण होऊन बसलंय. पण त्याहूनही अधिक गंभीर बाब म्हणजे याबद्दल वारंवार तक्रार करण्यात आलीय. तरीही कारवाई मात्र झालेली नाही. त्यामुळे या गुंड पप्पू मिश्राला कुमाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न विचारला जातोय.

पप्पू मिश्रा हा भाजपच्या झोपडपट्टी आघाडी युवा मोर्चाचा सचिव आहे. भीमटेकडी परिसरात तो राहतो. भीमटेकडी आणि सेमिनरी हिल्स या परिसरात त्याची दहशत आहे. कृष्णनगर परिसरातल्या समाजमंदिराच्या जागेवर अतिक्रमण करून त्यानं स्वत:चं घर बांधलं आहे. याच जागेवर तो गांजा, चरस आणि दारुची विक्री तसंच जुगार चालवतो. तो परिसरात देहविक्रीचा व्यवसायही करतो, असा स्थानिक महिलांचा आरोप आहे.

गेल्यावर्षीच पप्पू मिश्रा भाजपमध्ये आला. पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख यांनी त्याचा पक्षप्रवेश घडवला. विशेष म्हणजे यापूर्वी सुमित ठाकूर या गुंडाचा पक्षप्रवेशही याच सुधाकर देशमुखांनी घडवला होता. पप्पूच्या छेडछाडीला कंटाळून स्थानिक महिलांनी पोलिसांमध्ये तक्रारी केल्या. पण पोलिसांकडून कुठलीच कारवाई झाली नाही. हे प्रकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींपर्यंतही गेलं. पण हा स्थानिक प्रश्न आहे. स्थानिक नेतेच तो सोडवतील, असं उत्तर त्यांना मिळालं. त्यामुळे महिलांचं शील ही भाजपसाठी गंभीर बाब नाही का, असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Indian Politician

    हे भाजप वाले उत्तर प्रदेश आणि बिहार मधून भिकार्यांना नागपुरात आणून गुन्हेगारीना प्रोत्साहन देत आहे जसे बिहारीसुमित ठाकूरआणि हा भैया अखिलेख ऊर्फ पप्पू मिश्रा. भाजप वाल्यांना हे भैया प्रेम म्हणजे अच्छे दिन आहेत आणि लोकांचे बुरे दिन. आता नागपूरच्या लोकांनी पण संघ मुख्यालात जावून सगळ्यांना बडवले पाहिजे.

close