ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल जॉन्सनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

November 17, 2015 8:16 AM0 commentsViews:

670897-3505f554-7661-11e3-ae56-4ce697eaa265

17 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याने आंतरराष्ट्रीय क्रिकटेमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आज न्यूझीलंडविरूद्ध होणारा दुसर्‍या कसोटी सामन्यानंतर तो निवृत्त होत आहे.

मिचेलने एका पत्रकाद्वारे निवृत्तीची घोषणा केली आहे. निवृत्तीची हीच योग्य वेळ असून, माझी कारकिर्द चांगली राहिल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. देशासाठी खेळताना प्रत्येक क्षण जगलो. हा एक सुखद प्रवास होता. तो आता थांबणार आहे. निवृत्तीच्या घोषणेसाठी मी पर्थ क्रिकेट मैदानाची निवड केली. कारण हे मैदान माझ्यासाखी खास असल्याचे मिचेलने म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी वेगवान गोलंदाजांमध्ये मिचेलचे नाव आवर्जून घेतलं जातं. मिचेलच्या नावावर 73 कसोटीत 311, तर 153 एक दिवसीय सामन्यात 239 बळींची नोंद आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close