‘माय नेम इज खान’वर सेनेचा बाण

February 9, 2010 3:49 PM0 commentsViews: 3

9 फेब्रुवारीमाय नेम इज खान सिनेमाला विरोध करण्याचा शिवसेनेने चंगच बांधला आहे. मुंबईतील थिएटर्सवर शिवसेनेच्या बाणाने आता नेम धरला आहे. मुंबईतील मेट्रो सिनेमावर शिवसैनिकांनी दगडफेक केली आहे. थिएटरसमोरची सिनेमाची पोस्टर्सही या कार्यकर्त्यांनी फाडली आहेत. शिवसेनेचे एकूण 25 कार्यकर्ते मेट्रोजवळ आले होते. त्यापैकी 10 जणांनी तिकीट काढून आत प्रवेश केला तर 15 जणांनी बाहेर गोंधळ घातला. या प्रकरणी 5 शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले आहेत.शुक्रवारी रिलीज होणार्‍या या सिनेमाचे ऍडव्हान्स बुकिंग बंद पाडण्याचा प्रयत्न आज सकाळपासून शिवसैनिकांनी केला. दुपारीदेखील मुंबईत काही ठिकाणी सिनेमाची पोस्टर्सही फाडण्याचे प्रकार घडले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कांजूरमार्ग, मुलुंड, घाटकोपर इथल्या थिएटर्ससमोर निदर्शनं करणार्‍या 36 शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. 36 शिवसैनिक ताब्यातकांजूरमार्ग, मुलुंड, घाटकोपर येथील थिएटर्ससमोर निदर्शने करण्याचा प्रयत्न करणार्‍या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही धरपकड मुंबईत आता ठिकठिकाणी सुरु झाली आहे. आत्तापर्यंत शिवसेनेच्या 36 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.करण जोहर पोलिसात दरम्यान 'माय नेम इज खान'चा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने मुंबईचे पोलीस आयुक्त डी शिवानंदन यांची भेट घेतली आहे. सिनेमाला सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी यावेळी करण जोहरला दिले आहे. सर्व थिएटर्स तसेच प्रेक्षकांनाही सुरक्षा देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे जॉईंट सीपी हिंमाशू रॉय यांनीही या सिनेमाला सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांचे शाहरुखला आश्वासनदरम्यान शाहरुख खानने संरक्षणासाठी अन्य कुठेही जाऊ नये. शहारुखला तसेच सिनेमाला पूर्ण संरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा दिली आहे.

close