शिवसैनिक भूमिगत

February 9, 2010 3:56 PM0 commentsViews: 8

9 फेब्रुवारीमुंबईत सध्या जवळपास दीडशे शिवसैनिक भूमिगत झाले आहेत. शाहरुख खानचा माय नेम इज खान सिनेमा रिलीज होऊ देणार नाही अशी भूमिका शिवसनेने घेतल्याने पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड सुरु केली आहे. नेहमी आंदोलनात सहभागी होणार्‍या शिवसैनिकांना पोलीस ताब्यात घेत आहेत. सुभाष सावंत, जितेंद्र जनावळे, राजू पेडणेकर, नगरसेविका राजुल पटेल असे तोडफोडीत आघाडीवर असलेले शिवसैनिक सध्या भूमिगत आहेत. पोलिसांना माग सापडू नये म्हणून त्यांनी आपले फोनही बंद ठेवले आहेत. तर काहींनी नवीन सीमकार्ड घेऊन पर्यायी मोबाईल नंबर सुरू केले आहेत. विभागप्रमुख, शाखाप्रमुख अशा उपद्रवमूल्य असलेल्या शिवसैनिकांच्या घरी पोलीस ठाण मांडून बसले आहेत. काही पोलीस साध्या कपड्यांमध्ये शिवसेना शाखांवर जाऊन कोण कोण शिवसैनिक कोठे कोठे आहेत याचा तपास करत आहेत. आतापासूनच धरपकड सुरू केल्याने काहीसे गाफील असलेले शिवसैनिक पोलिसांच्या हातीही लागले आहेत.

close