बापट यांच्यावर छाप्यातली डाळ 97 रुपये किलोने विकण्याचा आरोप

November 17, 2015 5:15 PM0 commentsViews:

bapat dal_17 नोव्हेंबर : राज्याचे अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिवाळी पूर्वी 100 रुपये किलोने तूर डाळ देण्याची घोषणा केली आणि दोन दिवसांनंतर ही डाळ पुण्यात उपलब्धही करून दिली. पण, ‘डाळ में कुछ काला हैं’ असा वाद आता सुरू झाला. बापट यांनी रायगडमध्ये गुपचूप मारलेला छापा आणि तीच तूरडाळ भाजपचे माजी गटनेते अशोक येनपुरे यांच्या नावाच्या चलनाने त्यांनी ती 97 रु. किलोनं बेकायदेशीरपणे विकली असा गंभीर आरोप बापट यांच्यावर करण्यात आलाय.

पुणे महापालिकेतील काँग्रेसचे सभागृह नेते अरविंद शिंदे यांनी तुरडाळीसंदर्भात गिरीश बापट यांच्यावर गंभीर आरोप केलाय. बापट यांनी गुपचूपपणे खालापूर इथल्या एका कंपनीवर छापा टाकला आणि साठेबाजी केलेली डाळ जप्त केली. तीच तूरडाळ भाजपचे पुणे महापालिकेतील माजी गटनेते अशोक येनपुरे यांच्या नावाच्या चलनाने त्यांनी ती 97 रु. किलोनं बेकायदेशीरपणे विकत घेतली. आणि 100रु किलो दरानं तीच डाळ आता स्वस्त डाळ म्हणून बापट आणि भाजपचे नगरसेवक विकतायत असा आरोप शिंदे यांनी केलाय. ही सरळ-सरळ चोरी असून जप्त तूरडाळ विकण्याचा अधिकार नगरसेवकांना कुणी दिला असा प्रश्नही त्यांनी विचारला.

बापटांची भेट गुप्त का ?

रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील रानसई इथं असलेल्या ई.टी.सी. ऍग्रो या कंपनीमध्ये 6 हजार टन डाळीचा साठा असल्याने खालापूर पुरवठा विभागाने कंपनीमध्ये धाड टाकून सुमारे 55 कोटी रूपयांचा बेकायदेशीर साठा जप्त केलाय. राज्याचे अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी अचानक कंपनीत भेट देवून पाहणी केली. बापट यांचा हा दौरा अत्यंत गुप्त ठेवण्यात आल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बापट नक्की कसली पाहणी करण्यासाठी आले होते. असा सवालही उपस्थित केला जात असून बापट यांच्या बरोबर शासकीय यंत्रणा नसल्याने ही भेट वादात सापडली आहे. कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी बापटांच्या या गुप्त भेटीची चौकशी करण्याची मागणी केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close