मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांचे ‘अच्छे दिन’, सदाभाऊ खोत, जानकरांना लाल दिवा ?

November 17, 2015 5:40 PM0 commentsViews:

sadabhau on Vidhan parishadविनोद राऊत, मुंबई

17 नोव्हेंबर : बहुचर्चित मंत्रिमंडळाचा विस्तार या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. नाराज असलेल्या मित्र पक्षांना या विस्तारात सामावून घेण्याचे संकेत भाजपने दिले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळ विस्तार करुन भाजप मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप 3 मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देणार आहे.

या विस्तारात अनेक दिवसांपासून लाल दिव्याच्या गाडीची वाट बघणार्‍या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांना कॅबिनेट तर रासपचे नेते महादेव जानकर यांचीही राज्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते. तर आठवले गटाला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकतं.

मित्रपक्षांना काय मिळणार ?
- सदाभाऊ खोत, स्वा.शेतकरी संघटना, कॅबिनेट मंत्रिपद
- महादेव जानकर, रासप, राज्यमंत्रिपद
- आठवले गट – कॅबिनेट मंत्रिपद
- आठवले गटाकडून दोन नावं – अविनाश महातेकर आणि भूपेश थूलकर

केडीएमसी निवडणुकांमध्ये शिवसेनेला आक्रमक उत्तर देणारं भाजप, बिहारच्या निकालानंतर मात्र बॅकफूटवर आलंय.त्यामुळेचं इतके दिवस लांबणीवर टाकलेल्या मंत्रिमंडळविस्ताराला अखेर मुहूर्त मिळालाय. रामदास आठवलेंनी केंद्रातून राज्यात यावं असा भाजप नेतृत्वाचा आग्रह आहे. मात्र आठवले राज्यात परतायला फारसे इच्छूक नाही.

तर विनायक मेटे यांना सध्या राज्यंमंत्रिपदाचा दर्जा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होणार नसल्याचं सांगितलं जातंय. पण मंत्रिमंडळ विस्तारासोबतचं सदाभाऊ खोत आणि आठवले गटाच्या उमेदवाराला विधानपरिषदेवर निवडून आणण्याचं आव्हानही भाजपपुढे असेलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close