मंत्रिमंडळ विस्तारात सेनेकडून ‘सुभेदारी’ कुणाला ?

November 17, 2015 5:58 PM0 commentsViews:

Shiv Sena MLA's17 नोव्हेंबर : कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणुकीत भाजप विरु द्ध शिवसेना सामना आता संपला असला तरी मंत्रिमंडळ विस्तारात खरी कसोटी लागणार आहे ती शिवसेनेची. शिवसेनेला केवळ 12 मंत्रिपद आहेत. त्यात 5 कॅबिनेट, उर्वरीत 7 राज्यमंत्रिपद आहेत. यापैकी 5 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रिपदे पहिल्या विस्तारातच शिवसेनेने भरली होती. आता केवळ दोनच मंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला उरली आहे.

पण अजूनही मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र आणि चांगल यश देणार्‍या कोल्हापूरमधून कुणालाच प्रतिनिधीत्व दिलं नाही. ग्रामीण चेहर्‍यांना स्थान देण्यात सेना अपयशी ठरलीय. आणि दुसरं म्हणजे जनतेतून थेट निवडून आलेल्या आमदारांमध्ये असंतोष आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतून मंत्रिमंडळात येण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर, तर जळगाव ग्रामिणचे गुलाबराव पाटील, औरंगाबादचा सेनेचा दलित चेहरा संजय शिरसाट यांच्यापैकी दोघांना मंत्रिपद मिळू शकते. कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर याचांही समावेश शेवटच्या वेळी होवू शकतो.
शिवसेनेपुढची आव्हानं
– शिवसेनेला केवळ 12 मंत्रिपदं
– 5 कॅबिनेट, 7 राज्यमंत्रिपद
– 5 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रिपदं पहिल्या विस्तारातच भरली
– आता केवळ दोनच मंत्रिपदं सेनेच्या वाट्याला
– त्यामुळे प्रादेशिक समतोल राखणं अशक्य
– 3 आमदार निवडून देणार्‍या कोल्हापूरला मंत्रिपद नाही
– सेनेचा गड असणार्‍या मराठवाड्यातून कुणालाच मंत्रिपद नाही
– उत्तर महाराष्ट्रातून कुणालाच प्रतिनिधित्व नाही
– ग्रामीण चेहर्‍यांना स्थान देण्यात सेना अपयशी
– जनतेतून थेट निवडून आलेल्या आमदारांमध्ये असंतोष

सेनेचे हे आमदार स्पर्धेत
– अर्जुन खोतकर, जालना
– गुलाबराव पाटील, जळगाव ग्रामीण
– संजय शिरसाट, औरंगाबाद
– राजेश क्षीरसागर, कोल्हापूर

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close