खडसे, तावडे आणि पंकजा मुंडेंची अतिरिक्त खाती होणार कमी ?

November 17, 2015 7:36 PM0 commentsViews:

devendra-fadnavis-eknath-khadse-pankaja-munde-vinod-tawde17 नोव्हेंबर : राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये चार कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ मंत्र्यांकडे असलेली खाती कमी होण्याची शक्यता आहे.

कारण महसूल मंत्री एकनाथ खडसे, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे अतिरिक्त भार देण्यात आलाय. एकनाथ खडसे यांच्याकडे सध्या 8 खात्यांचा कारभार आहे.

तर विनोद तावडेंकडे 6 आणि पंकजा मुंडेंकडे 4 खाती आहे. त्यामुळे त्यांच्याकडची मंत्रिपद काढून घेण्याची शक्यता आहे. तिन्ही मंत्र्यांकडील अतिरिक्त खाती नव्याने मंत्रिपदाचा भार स्विकारणार्‍यांना देण्याची शक्यता आहे.
कुणाची खाती कमी होऊ शकतात ?

एकनाथ खडसे – सध्या 8 खात्यांचा कारभार आहे. कृषी आणि उत्पादन शुल्क खातं जाऊ शकतं
विनोद तावडे – 6 खाती आहेत, त्यातील वैद्यकीय शिक्षण खातं कमी होऊ शकतं
पंकजा मुंडे – चार खाती आहेत, जलसंधारण जाण्याची शक्यता

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close