मंत्रिमंडळ विस्तारात भाजपपुढे प्रादेशिक समतोल साधण्याचं आव्हान

November 17, 2015 7:10 PM0 commentsViews:

BJP vidhansabhaविनोद राऊत, मुंबई

17 नोव्हेंबर : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागताच, भाजपमध्ये अनेकांमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झालीये. मात्र, भाजपचे चेहरे निवडतांना प्रादेशिक फॅक्टरही महत्वाचा आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी भाजपच्या आमदारांनी लॉबिंग सुरू केलंय. विस्तार करताना भाजपला प्रादेशिक समतोल साधण्याची आव्हानं असेल. पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतून एका चेहर्‍याचा समावेश मंत्रिमंडळात होईल. उत्तर महाराष्ट्रातून धुळ्याचे आमदार जयकुमार रावळ तर मराठवाड्यातून निंलग्याचे आमदार संभाजी निलंगेकर यांची निवड पक्की असल्याच सूत्र सांगत आहेत.

भाजपमध्ये विस्तार

उत्तर महाराष्ट्र – जयकुमार रावळ, आमदार, सिंदखेडा, धुळे
मराठवाडा – संभाजी निलंगेकर, आमदार निंलगा (लातूर)

पश्चिम महाराष्ट्रात भाजपला बर्‍यापैकी यश मिळालंय. त्यामुळे सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख किंवा सांगली जिल्ह्यातील आमदार शिवाजी नाईक यांच्यापैकी एकाची वर्णी लागू शकते.

पश्चिम महाराष्ट्र
– सुभाष देशमुख, आमदार सोलापूर
– शिवाजी नाईक, आमदार शिराळा (सांगली)

पश्चिम विदर्भात भाजपला चांगल यश मिळालं, पण या भागाला फक्त दोन मंत्रिपद मिळाली आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भाला आणखी एक मंत्रिपद मिळू
शकतं. एकट्या बुलडाणा जिल्ह्यातून चैनसुख संचेती,पाडूरंग फुंडकर आणि संजय कुटे हे मातब्बर शर्यतीच आहेत.

पश्चिम विदर्भ
चैनसुख संचेती, आमदार, मलकापूर
संजय कुटे, जळगाव, जामोद
पांडुरंग फुंडकर, विधान परिषद

मुंबईतून मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांच्यापैकी एकाचा समावेश होईल. पण शेलार यांच्याकडे मुंबई पालिका निवडणुकांची मोठी जबाबदारी असणार आहे, त्यामुळे मंगलप्रभात लोढांची वर्णी लागण्याची शक्यता जास्त आहे. मित्रपक्षाची नाराजी दूर करतांना, भाजपमध्ये अंतर्गत नाराजी वाढू नये याची कसरत देवेंद्र फडणवीस यांना करावी लागणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close