सातार्‍याचे कर्नल महाडिक सीमेवर शहीद, उद्या होणार अंत्यसंस्कार

November 18, 2015 6:08 PM0 commentsViews:

4

18 नोव्हेंबर : भारत-पाक आंतराष्ट्रीय सीमेजवळ दहतशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराच्या 41 राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक (39) शहीद झाले. तर एक पोलीस जखमी झाला. महाडिक हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

कुपवाडाच्या दाट जंगलाच्या परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यानंतर शोधमोहिम हाती घेण्यात आली होती. तिचे नेतृत्त्व कर्नल संतोष महाडिक करत होते. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथे त्यांना वीरगती प्राप्त झाली. 1998 मध्ये ते लष्करात विशेष दलात दाखल झाले आणि अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना ‘शौर्य पदका’ने गौरवण्यात आलं होतं.

महाडिक यांना लष्कराच्या वतीने मानवंदना देण्यात आली असून, त्यांचे पार्थिव विशेष विमानाने पुण्याकडे रवाना झालं आहे. पुणे विमानतळावर त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. त्यानंतर संतोष महाडिक यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सातार्‍यात ठेवलं जाईल. महाडिक यांच्यावर उद्या सकाळी पोगरवाडी या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ट्विटरवरून महाडिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close