पतंजली आटा नूडल्सला अन्नसुरक्षा प्राधिकरणाची मंजुरीच नाही?

November 18, 2015 2:39 PM0 commentsViews:

52_05_48_29_baba-ramdev-atta-noo1_H@@IGHT_447_W@@IDTH_670

18 नोव्हेंबर : योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड प्रॉडक्टस कंपनीने काढलेल्या पतंजली आटा नूडल्सला बाजरात दाखल होताच वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. आटा नूडल्सला भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाची (FSSAI) अद्याप परवानगी मिळाली नसल्याचं समोर आलं आहे.

बाबा रामदेव यांनी सोमवारी पत्रकार परिषज घेऊन मोठा गाजावाजा करत पतंजली आटा नूडल्स लाँच केली. मात्र लाँच होण्याच्या दोन दिवसांनंतरच आटा नूडल्सलाही वादात सापले आहेत.भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकारणाची या नूडल्सला परवानगी नसल्याचे समोर आले आहे.

याविषयी एफएसएसएआयचे प्रमुख आशिष बहुगूणा म्हणालं, आटा नूडल्सचे प्रकरण आमच्याकडेही आले आहे. आम्ही अद्याप नूडल्सला परवानगी दिलेली नाही. या प्रकरणाची चौकशी करत आहोत. परवाना देण्याचे काम राज्य सरकारचे असते. पण आम्ही परवानगी दिली नसताना राज्य सरकारने परवाना कसा दिला?, असा सवाल एफएसएसएआयच्या अधिकार्‍यांनी उपस्थित केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close