26/11 हल्ल्याप्रकरणी डेव्हिड हेडलीही आरोपी

November 18, 2015 5:38 PM0 commentsViews:

tumblr_mgytxghcgW1s0zsj4o1_1280

18 नोव्हेंबर : मुंबईवर 26/11ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा एक सूत्रधार आणि कुख्यात दहशतवादी डेव्हिड हेडलीला या हल्ल्याप्रकरणी सहआरोपी बनवण्याची मुंबई पोलिसांची मागणी मुंबई विशेष टाडा कोर्टाने मंजूर केली आहे. कोर्टाने हेडलीविरोधात समन्स जारी केले असून, त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 10 डिसेंबर रोजी सुनावणीवेळी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबईत झालेल्या 26 /11च्या दहशतवादी हल्ल्यात डेव्हिड हेडलीने रेकी तयार करुन हल्ल्याचा संपूर्ण कट आखण्याची महत्त्वापूर्ण भूमिका बजावली होती. रिचर्ड डेव्हिड हेडली याला अमेरिकेच्या शिकागो कोर्टाने 26/11 हल्ल्याप्रकरणी 35 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सध्या तो अमेरिकेच्या ताब्यात आहे. त्या आधारावर त्याला आरोपी बनवून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदवण्याची मागणी सेशन्स कोर्टात करण्यात आली होती. ही मागणी मान्य करत न्यायालयाने शिकागो न्यायालयाला हेडलीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 10 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, आम्ही अमेरिकन कोर्टाच्या एका निर्णयाच्या आधारे हेडलीला सहआरोपी करण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे त्याला भारतीय नागरिक असलेल्या अबु जिंदालसोबत सहआरोपी करण्यात आले असल्याचं विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकमयांनी यावेळी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close