राडाबहाद्दर ताब्यात

February 10, 2010 9:00 AM0 commentsViews: 6

10 फेब्रुवारीमाय नेम इज खान सिनेमाविरोधात आंदोलन करणार्‍या 1600 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या 56 शिवसैनिकांना स्थानबद्ध करण्याचा निर्णय विक्रोळी कोर्टाने दिला आहे. या शिवसैनिकांना 12 फेब्रुवारीपर्यंत ठाणे येथील सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. अंधेरी सेशन कोर्टानेही 7 शिवसैनिकांना आठवड्याची पोलीस कोठडी दिली आहे. प्रतिबंधात्मक कारवाईसाठी अटक केलेले हे शिवसैनिक जुहू-अंधेरी परिसरातील आहेत.शिवसेनेचे नेते दगडू सकपाळ यांना पोलिसांनी अटक केली. मात्र त्यांना माझगाव कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची लगेचच जामिनावर सुटका करण्यात आली. मुंबई पाठोपाठ पुण्यातही शिवसैनिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याचे आदेश सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आले आहेत. दरम्यान, या कारवाईच्या भीतीनेच मुंबईत सध्या जवळपास दीडशे शिवसैनिक भूमिगत झाले आहेत. मुंबई पाठोपाठ पुण्यातही शिवसैनिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात मंत्रालयात बैठक सुरू आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील, गृहसचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. माय नेम इज खान सिनेमाच्या रिलीजच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यस्थेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक सुरू आहे.

close