खासदारांकडून सुरक्षा परत

February 10, 2010 9:18 AM0 commentsViews: 4

10 फेब्रुवारीगरज पडली तर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सुरक्षा काढून घेऊ असा इशारा काल मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला. त्याला उत्तर म्हणून उद्धव यांनी स्वत:हून आपली सुरक्षा परत करण्याची घोषणा केली. त्याचवेळी शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी आपली सुरक्षा परत करतील, अशी घोषणा शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांनी केली. त्यानुसार शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे आणि चंद्रकांत खैरै यांनी आपली सुरक्षा परत केली आहे. यासंदर्भात त्यांनी लोकसभेच्या सभापती मीराकुमार यांना पत्र लिहिले आहे. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार भारतकुमार राऊत यांनीही सुरक्षा परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ठाणे जिल्ह्यातल्या शिवसेना आमदारांनीही सुरक्षा व्यवस्था परत करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही आपली सुरक्षा परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांना त्यांनी तसे पत्रही दिले आहे.

close