‘माझी सुरक्षा कसाबला द्या’

February 10, 2010 9:33 AM0 commentsViews: 2

10 फेब्रुवारी'मी सुरक्षा व्यवस्था परत केली आहे. त्याचे पुढे काय झाले हे मला माहीत नाही', असे सांगतानाच 'माझी सुरक्षा कसाबला द्या', असा उपरोधिक टोला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मारला आहे. 'जनता म्हणतेय हमको खाना चाहीये तर अशोक चव्हाण म्हणतात खान चाहिये', अशी टीकाही उद्धव यांनी केली आहे. याचवेळी 'मातोश्री'वर मुंबईतील प्रत्येक शाखेचे 10 शिवसैनिक आळी पाळीने संरक्षणासाठी थांबणार आहेत. दुसरीकडे शाहरुख खान जे बोलला ते देशविरोधीच आहे. त्याने त्याच्या वक्तव्याचा पुन्हा एकदा विचार करावा, असे सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी म्हटले आहे. माय नेम इज खान सिनेमाच्या विरोधात असे वातावरण तापले असताना याच सिनेमाच्या प्रीमियरसाठी शाहरुख खान पहाटेच दुबईला रवाना झाला आहे.

close