लवकरच सरकारी कर्मचार्‍यांना येणार ‘अच्छे दिन’?

November 19, 2015 1:50 PM0 commentsViews:

Sir narendra modi

19 नोव्हेंबर : दिवाळीनंतर सर्वच शासकीय कर्मचार्‍यांना अच्छे दिन येणार आहेत कारण, मोदी सरकार लवकरच सातवा वेतन आयोग जाहिर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आयोग लागू झाल्यास कर्मचार्‍यांना 15 टक्के वेतन वाढवून मिळणार आहे.

सातवा वेतन आयोग केवळ केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी नाही तर, सर्वच शासकीय कर्मचार्‍यांनाही लागू होणार आहे. म्हणजे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ झाल्यानंतर राज्य सरकारही आपल्या राज्यातील कर्मचार्‍यात वाढ करणार आहे. या शिफारशींची यादी पूर्ण झाली असून, आयोग आज ही यादी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे सोपवणार आहे. जर केंद्रीय स्थरावरून शिफारस मंजूर झाल्यास जानेवारी 2016 पासून लागू होऊ शकतो. पण वेतन वाढ एप्रिलपासून मिळेल.

शिफारसीनुसार वेतनात 15 टक्के वाढ झाल्यास कमीत कमी वेतन 15 हजारापर्यंत होण्याची शक्यता असल्याचं वर्तवण्यात येत आहे. 2014 मध्ये सातव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्यास केंद्राचे 50 लाख कर्मचारी आणि 56 लाख निवृत्त कर्मचार्‍यांना त्याचा आर्थिक लाभ होणार आहे. पण यामुळे सरकारच्या तिजोरीवर निश्चितच मोठा ताण पडणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close