गोदावरीच्या पाण्यावरून मराठवाडा-नगरमध्ये जुंपली

November 19, 2015 7:53 PM0 commentsViews:

अहमदनगरमधून हरीश दिमोटे, औरंगाबादहून सिद्धार्थ गोदाम

19 नोव्हेंबर : मराठवाडा आणि अहमदनगरमध्ये पाण्यावरुन मोठा संघर्ष उभा राहिला आहे. आमच्या हक्काचं पाणी मराठवाड्यानं चोरंल असं नगरकर म्हणतायेत. तर आम्ही पाणी चोरलेलं नाही असं मराठवाड्याचे शेतकरी म्हणतायेत. मात्र मराठवाड्यात शेकडो मोटारव्दारे पाणी उपसण्याची चित्र काल (बुधवारी) समोर आलं. तर आज तशीच काही दृश्यं नगरमध्ये दिसली. मात्र या दोन्ही दृश्यांमागची कहाणी काही वेगळीच आहे.

sdasdasssdeq32y

कोर्टाच्या आदेशानुसार नगर जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्यात आलं. पण हे पाणी फक्त पिण्यासाठीच वापरा, असं कोर्टाने ठणकावून सांगितलं. या आदेशाची अंमलबजावणी होतेय की नाही, हे पाहण्यासाठी नगरच्या शेतकर्‍यांनी औरंगाबादमध्ये धडक दिली. जायकवाडी धरणाच्या अलिकडे शेकडो मोटर्स लावून पाणी शेतात सोडल्याचं चित्र त्यांना दिसलं. मग अहमदनगरच्या शेतकर्‍यांनी मराठवाड्याच्या शेतकर्‍यांवर थेट पाणी चोरीचा आरोप केला.

धरणातून पाणी चोरी करण्यासाठी मैलोनमैलाचे पाट दिसले, पण त्यामागचं सत्य काही तरी वेगळं आहे. हे सगळं कायदेशीर होतं असल्याचं इथल्या शेतकर्‍यांनी पुराव्यासहीत स्पष्ट केलं. पण पंप फक्त मराठवाड्यातच लागले नाहीयेत. ते नगर जिल्ह्यातही लावण्यात आले आहेत. एवढचं नाही तर इथे तर विजेच्या तारांवर आकडे टाकलेले दिसतायत आणि याचं कनेक्शन जातंय ते गोदावरीच्या काठावर असलेल्या पाण्याच्या पंपाकडे. त्यामुळे नगरमधला उपसा बेकायदेशीर आहे, असा प्रत्यारोप आता औरंगाबादच्या शेतकर्‍यांनी केला आहे.

गोदावरीच्या पाण्यावरून वाद नेहमीच होतो. पण आता शेतकरी पलिकडच्या जिल्ह्यात जाऊन पाहणी करू लागल्याने वाद चिघळण्याची चिन्हं आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close