शीना बोरा हत्याप्रकरण : पीटर मुखर्जीला सीबीआयकडून अटक

November 19, 2015 8:44 PM0 commentsViews:

daasdasay

19 नोव्हेंबर : शीना बोरा हत्याप्रकरणाला नवं वळण लागलं असून इंद्राणी मुखर्जीचे तिसरे पती पीटर मुखर्जी यांना सीबीआयच्या पथकाने आज (गुरूवारी) अटक केली आहे. सीबीआयने आज मुंबईच्या वरळी इथल्या निवासस्थानातून पीटर मुखर्जी यांना अटक केली.हत्येची माहीती लपवल्याच्या आरोपाखाली पीटर यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, या प्रकरणातील ही चौथी अटक असून याआधी पीटर यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी, तिचा आधीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय अशा तिघांना मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. स्टार ग्रुपचे माजी सीईओ असलेल्या पीटर मुखर्जी यांची याप्रकरणात खार पोलिसांनी अनेकदा चौकशी केली होती. त्यातच राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेत सीबीआयकडे सोपवला. त्यानंतर आजच सीबीआयने याप्रकरणी 1000 पानी आरोपपत्र दाखल केलं आहे.

रायगडमध्ये मिळालेले अवशेष शीना बोराचेच आहेत, हे आता स्पष्ट झालंय. एम्सच्या फॉरेन्सिक टीमनं यावर शिक्कामोर्तब केलंय. इतर तीन अहवालांमध्येही हे स्पष्ट झालंय. मे 2012 मध्ये आई इंद्राणी मुखर्जी हिनं शीनाची हत्या केल्याचा आरोप आहे. तिचे जळालेल्या अवस्थेतले अवशेष रायगडच्या जंगलात सापडले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close