‘मी राजीनामा द्यायला तयार’

February 10, 2010 11:59 AM0 commentsViews: 3

10 फेब्रुवारीनागपूर टेस्टमध्ये भारताच्या पराभवाची जबाबदारी निवड समितीचे अध्यक्ष श्रीकांत यांनी घेतली आहे. आपण राजीनामा द्यायला तयार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. नागपूर टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकन टीमने भारताचा एक इनिंग आणि सहा रन्सनी पराभव केला. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेकडून टेस्टच्या चौथ्या दिवशी पराभव पत्करण्याची वेळ टीम इंडीयावर आली. त्यामुळे भारतीय टीमच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. आणि याच पराभवाची नैतिक जबाबदारी निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी घेतली आहे. बीसीसीआयला राजीनामा हवा असल्यास मी तो द्यायला तयार आहे, अशी परखड भूमिका श्रीकांत यांनी व्यक्त केली आहे. नागपूर टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतर निवड समितीवर टीका होऊ लागली आहे.

close