बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमारांचा आज शपथविधी

November 20, 2015 1:48 PM0 commentsViews:

nitish-kumar-52

19 नोव्हेंबर : जेडीयूचे नेते नितीश कुमार आज पाचव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पाटणाच्या गांधी मैदानावर शपथविधीचा सोहळा होणार आहे.

नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ घेणार आहेत. यावेळी नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळातील काही नेतेही मंत्रीपदाची शपथ घेतील. नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळात जेडीयूचे 12, लालूंच्या राजदचे 12 आणि काँग्रेसचे 4 मंत्री असतील अशी सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान, शपथविधी सोहळ्यासाठी नितीशकुमार यांनी अनेक महत्त्वाच्या नेत्यांना आमंत्रण दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तसंच सेनेचे सुभाष देसाई यावेळी हजर राहणार आहेत. तसंच राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close