नितीशकुमारांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

November 20, 2015 3:50 PM0 commentsViews:

Bihar CM12

20 नोव्हेंबर : भाजपला पराभवाची धूळ चारून बिहारमध्ये पुन्हा सत्तेवर आलेल्या महाआघाडीचे प्रमुख नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पाचव्यांदा नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत. यावेळी नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी उपमुख्यंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, शपथ घेतना शब्दांचा उच्चर चुकल्याने तेजस्वी यांनी दुसऱयांदा शपथ घ्यावी लागली. नितीशकुमारांच्या मंत्रिमंडळात जेडीयूचे 12, राजदचे 12 आणि काँग्रेसचे 4 मंत्री असतील अशी माहिती आहे.

दरम्यान, नितीशकुमार याच्या शपथविधीला सर्वच मोदी विरोधकांनी हजेरी लावून एकजुटीचे दर्शन घडवलं. नितीशकुमार यांच्या शपथविधीला जदयूचे अध्यक्ष शरद यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित, लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीराकुमार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडूही शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close