‘माली’मध्ये बंदुकधार्‍यांचा धुमाकूळ, 170 जण ओलीस

November 20, 2015 6:10 PM0 commentsViews:

terror

20 नोव्हेंबर : फ्रान्सच्या पॅरिसमधील दहशतवादी हल्ला ताजा असतानाच, तिकडे आफ्रिका खंडातील माली या देशातही दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. पश्चिम आफ्रिकेतील मालीची राजधानी बामाको इथल्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये 3 बंदुकधार्‍यांनी 170 जणांना ओलीस ठेवलं आहे. यातल्या 80 जणांची सुटका झाली आहे, पण बाकी ओलीस अजूनही हल्लेखोरांच्या ताब्यात आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत 3 जण ठार झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, मालीची राजधानी बामाकोच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये ओलीस ठेवलेल्या 170 नागरिकांपैकी सर्व 20 भारतीय सुरक्षित आहेत.

मालीची राजधानी बामकोमध्ये असलेल्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये घुसून अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्यक्षदशीर्ंनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर अल्लाह-ओ-अकबर, अल्लाह-ओ-अकबर ओरडत होते. सुरक्षा रक्षकांनी हॉटेलला चहूबाजूंनी घेरलं असून, बंधकांना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. 190 खोल्यांचं हे हॉटेल आहे. या गोळीबारात अनेकजण जखमी झाले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close