तूरडाळीपाठोपाठ भाज्यांचे भावही कडाडले, पण शेतकर्‍यांचे हात रिकामे!

November 20, 2015 7:59 PM0 commentsViews:

Bhajipala12

20 नोव्हेंबर : कांद्याचे वाढते भाव आणि ऐन दिवाळीत तूरडाळीने मध्यमवगच्यांच्या तोंडाला फेस आणला आहे. आता त्यात भर म्हणून की काय भाज्यांचे दरही गगनाला भिडत आहेत. महागाईमुळे आधीच कंबरमोड होत असताना आता टोमॅटोच्या दरांनीही शंभरी गाठली आहे. यामुळे शंभरीच्या घरात पोहोचलेला टोमॅटो मंडईतून गायब होऊ लागल्याचे चित्र आहे. मात्र भाज्यांचे भाव वाढूनही या भाज्या पिकवणार्‍या शेतकर्‍यांची झोळी नेहंमीसारखी रिकामीच असल्याचं समोर येतं आहे. सध्या बाजारात टोमॅटो 60 ते 80 रुपये किलो दराने विकला जातोय, प्रत्यक्षात त्याची खरेदी मात्र 30 ते 40 रूपयाने केली जातेय. किमतीतील हीच तफावत इतरही पालेभाज्यांच्या दरांमध्ये बघायला मिळतीये. असं असूनही शेतकर्‍यांच्या हातात उत्पादनासाठी केलेल्या खर्चाच्या केवळ 2 ते 5 टक्के एवढाच नफा पडतो आहे.

तर दुसरीकडे महागाईचा फास मध्यमवर्गीयांच्या गळ्यातून काही सुटता सुटत नाही. कांदा आणि तूरडाळीनंतर आता टोमॅटोच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. एरवी 5 ते 10 रुपये किलोने विकले जाणारे टोमॅटो थेट 80 ते 100 रुपये किलो झाल्यामुळे अनेक सामान्य ग्राहकांनी टोमॅटोकडे पाठ फिरवली आहे. भाजी मंडईतही अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या भाजी व्रिकेत्यांकडे टोमॅटो पाहायला मिळतात.

बळीराजाचे हात रिकामे
किरकोळ बाजारात         शेतकर्‍यांच्या हातात

  • टोमॅटो             60 ते 80 रु/किलो            30 ते 40 रु/किलो
  • कांदा               60 ते 70 रु/किलो            30 ते 40 रु/किलो
  • पालक,मेथी              20 रु/किलो                5 ते 7 रु/किलो
  • कोथिंबीर                  20 रु/किलो                5 ते 7 रु/किलो
  • लसून                      160 रु/किलो                50 रु/किलो
  • फुलकोबी                  60 रु/किलो                8 ते 10 रु/किलो
  • वाटाणा          60 ते 70 रु/किलो

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close