पुणे महापालिकेत ‘वल्हव वल्हव’!

November 20, 2015 9:17 PM0 commentsViews:

अनोख्या आंदोलनासाठी पुणं नेहमीच चर्चेत असतं. हेल्मेटची शवयात्रा इथेच काढली गेली तर जेम्स लेनला ‘कागदी हत्तीच्या’ पायीदेखील इथेच तुडवलं गेलं. आज पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मनसे आंदोलनकर्ते बोट वल्हवतच पोहचले. कात्रज उद्यानात 2009 साली मगर आढळली तेव्हापासून बोटिंग बंद करण्यात आलं. आज आंदोलनकर्त्यांनी पुणेकरांसाठी कात्रजमधल्या फुलराणी रेल्वे बरोबरच असलेल्या तलावात बोटिंग सुरु करण्याची मागणी केली. हे आंदोलन सुरु असतानाच गोंधळ कमी म्हणून की काय भाजप आणि शिवसेनेने बाबासाहेब पुरंदरेंचा नागरी सत्कार करावा ही मागणी करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात घोषणा दिल्या.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close