अच्छे दिन येण्यास वेळ लागेल, अडवाणींकडून मोदींची पाठराखण

November 22, 2015 2:41 PM0 commentsViews:

Narendra Modi, Lal Krishna Advani22 नोव्हेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठराखण केलीये. मोदी सरकारच्या कामाची दिशा योग्य आहे. पण अच्छे दिन येण्यासाठी वेळ लागेल असं मत व्यक्त करत अडवाणींनी मोदींचं समर्थन केलंय.

गुजरातमध्ये स्थानिक निवडणुका सुरू असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज लालकृष्ण अडवाणी अहमदाबादमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाच्या प्रतिनिधींनीशी संवाद साधला. अच्छे दिन येण्याच्या प्रक्रियेला वेळ लागेल पण दिशा ठिक असली तर परिणामही चांगले असतील असा विश्वास अडवाणींनी व्यक्त केला. आज मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार हा महत्त्वपूर्ण आहे. गेली कित्येक वर्षं नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये काम करतांना पाहत आलोय. आज नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून योग्य पद्धतीने काम करत असल्याचं पाहून मला आनंद आहे असंही अडवाणी म्हणाले. विधानसभा आणि लोकसभेचा निकाल जसा भाजपच्या बाजूने लागला तसा स्थानिक निवडणुकीचा निकालही लागावा अशी अपेक्षाही अडवाणींनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, अलीकडेच बिहार विधानसभा निवडणुकीत पराभवाला भाजपच्या चार ज्येष्ठ नेत्यांनी मोदी-शहा जोडीला जबाबदार धरलं होतं. यात लालकृष्ण अडवाणी सुद्धा होते. त्यानंतर आज पहिल्यांदाच अडवाणी मीडियासमोर आले. बिहारमधील पराभवामुळे आत्मचिंतन करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रियाही त्यांंनी दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close