डिसेंबरनंतर दुष्काळाची परिस्थिती आणखी गंभीर बनेल -पवार

November 22, 2015 3:07 PM0 commentsViews:

pawar_on_droght२२ नोव्हेंबर - दुष्काळाचं संकट मोठं असून डिसेंबर महिन्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर बनेल अशी भीती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. पुण्यातील भारतीय जैन संघटनेने दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या 325 मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा कार्यक्रम पवारांच्या उपस्थिती पार पडला यावेळी ते बोलत होते.

दुष्काळाचं संकट मोठ यावेळेस राजकारण न करता,संकटात सापडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम कारायचं असतं. आत्ता डिसेंबर येईन पण त्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर बनेल अशी भीती पवारांनी व्यक्त केली. केंद्र पातळीवरची टीम दुष्काळाग्रस्त भागाची पाहणी करत असताना तिथल्या लोकांच्या संतापाला सामोरे जाव लागल त्यात ग्रामस्थांचीही चूक  नाही. पाहणी करण्यास आलेली समिती अहवाल पाठवेन आणि केंद्र व राज्य सरकार दखल घेतील असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close