दारू पार्टी पडली महागात, तलावात बुडून दोघांचा मृत्यू

November 22, 2015 4:25 PM0 commentsViews:

mastani talva२२ नोव्हेंबर – पुण्याजवळच्या दिवे घाटातल्या मस्तानी तलावात बुडून दोघांचा मृत्यू झालाय. तर तिघांना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळालंय.

मस्तानी तलावाच्या काठावर पाच जणांनी मिळून दारुपार्टी केली. या पार्टीत दारू जास्त प्यायल्यानं पाण्यात पडून बुडून दोघांचा मृत्यू झालाय. बाकीचे 3 जण सुरक्षित आहेत अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मृतांमधल्या सुनील गायकवाड या तरुणाचा सहभाग आहे. सुनील गायकवाडचं पाचच दिवसांनी लग्न होतं. हे सर्व तरुण अंदाजे 20-25 या वयोगटातले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close