…म्हणून बाजीराव-मस्तानी !,बाजीरावांच्या मृत्यूनंतर मस्तानीने केली होती आत्महत्या

November 22, 2015 5:39 PM0 commentsViews:

mastni_pkgहलीमा कुरेशी,पाबळ

२२ नोव्हेंबर - संजयलीला भन्साली यांच्या ‘बाजीराव – मस्तानी’ या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा रंगलीय. ‘पिंगा -पिंगा’ या गाण्यानंतर मस्तानी आणि काशीबाई एकत्र नृत्य कसं करू शकतात यावरून नाराजी व्यक्त करण्यात आली. मस्तानीचं सौंदर्य आणि बाजीरावाच तिच्यावरच प्रेम याचे ऐतिहासिक पुरावे देखील सापडतात. प्रत्यक्षात बाजीरावांच्या निधनानंतर मस्तानीने पाबळ येथे आत्महत्या केली होती. तेथे आजही मस्तानीची कबर आहे. पाबळमधून हा खास रिपोर्ट

मस्तानीचा ऐतिहासिक वारसा सांगणारं हेच ते पाबळ गाव…पुण्यापासून साधारण 60 किलोमीटर अंतरावर….बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूची वार्ता ऐकून याच गावात मस्तानीने आत्महत्या केली होती. मस्तानीच्या गढीतच तिची कबर बांधण्यात आलीय. तिच्या कबरीवर फुललेला हा जाईचा वेल आपसूकच तुमचं लक्ष वेधून घेतो. आज हीच कबर हिंदू-मुस्लीन ऐक्याच प्रतिक बनलंय. हिंदूंसाठी ती समाधी आहे तर मुस्लिम धर्मियांसाठी कबर.

कबरीजवळच मस्जीद सुद्धा आहे. इथे इनामदार कुटुंबीय गेले सहा पिढ्यांपासून दिवाबत्तीची सेवा देतात. पण 2009 साली काही चोरट्यांनी हिरे मिळतील या उद्देशाने मस्तानीच्या कबरीचीही मोडतोड केली गेली. पण गावकऱ्यांनी लगेच कबरीची पुनर्रबांधनी केलीय.

कबरीच्या शेजारीच एक कब्रस्तान असून तिथे मस्तानी दर्गाह बांधण्यात आलीय. संजय लीला भन्सालीच्या बाजीराव मस्तानी चित्रपटात मात्र या स्थळाची साधी दाखल घेतली गेली नाही.

अमर प्रेमाची दंतकथा बनलेल्या मस्तानीच्या बद्दल अजूनही अनेक गोष्टी कळू शकलेल्या नाहीत. पाबळमध्ये मात्र तीच मस्तानी प्रेमाबरोबरच हिंदू-मुस्लिम ऐक्याचं देखील प्रतिक बनून गेलीय.

कोण होती मस्तानी ?

छत्रसाल राजाची मुलगी असलेली मस्तानी राजकन्या होती. तीची आई रुहांना ही पर्शियन होती. प्रणामी पंथामूळे छत्रसाल राजा हिंदू आणि मुस्लिम बंधुभाव मानणारा होती. मस्तानेदेखिल त्याच संस्कारात वाढली होती.  छत्रसाल यांच्या बुंदेलखंड राज्यावर मोहम्मद खान बम्दश याने आक्रमण केलं होतं. त्याच्या विरोधात लढण्यासाठी छत्रसाल राजाने बाजीराव पेशवा यांची मदत घेतली. आणि त्यात त्यांना विजय मिळाला. या विजयानंतर राज्याचा काही भाग आणि मस्तानी बाजीराव पेशव्यांना इनामात दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close