मंगेशचा नवा अल्बम

February 10, 2010 1:09 PM0 commentsViews: 1

10 फेब्रुवारी'झी सारेगमप'पासून चर्चेत आलेला मंगेश बोरगावकर आता त्याचा नवीन अल्बम घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 'दिवाना झालो मी तुझा' या त्याच्या अब्लमचे प्रकाशन मुंबईत नुकतेच पार पडले. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी या अल्बमसाठी संगीत दिले आहे. यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष, अभिनेता भरत जाधव उपस्थित होते. व्हॅलेंटाईन डे अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना मंगेशचा 'दिवाना झालो मी तुझा' हा अल्बम सगळ्यांसाठीच गिफ्ट ठरणार आहे. या अल्बममधली काही गाणीही मंगेशने यावेळी सादर केली.

close