सातव्या वेतन आयोगामुळे कामचुकार कर्मच्यार्‍यांवर येणार संक्रांत ?

November 23, 2015 6:07 PM0 commentsViews:

seventh commission23 नोव्हेंबर : गेल्या गुरुवारी 7 व्या वेतन आयोगाने आपला अहवाल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना सादर केला. 7 वं वेतन आयोग लागू होईल या खुशीत असणार्‍यांना बाबूंना मात्र आयोगाने चांगलाच धक्का दिलाय. कारण यातल्या काही महत्त्वाच्या शिफारसी आता बाहेर आल्या आहेत. केंद्रीय कर्मचार्‍यांना थेट बोनस न देता, कामगिरीनुसार पगार द्या, अशी महत्त्वाची शिफारस आयोगानं केली आहे. ज्यांचं काम चांगलं नाही, ज्यांच्या कामात सुधारणा नाही, त्यांची वार्षिक वेतनवाढ आणि पदोन्नती रद्द करा, असंही आयोगानं म्हटलं आहे. या अहवालाचा नीट अभ्यास करूनच निर्णय घेतले जातील, असं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनी स्पष्ट केलं.
7व्या वेतन आयोगाच्या काही महत्त्वाच्या शिफारसी

- केंद्रीय कर्मचार्‍यांना कामगिरीशी निगडीत पगार द्या
- सरसकट बोनस देणं बंद करा
- 20 वर्षांच्या सेवेनंतरही कामाचा दर्जा सुधारू न शकलेल्यांची वेतनवाढ रद्द करा
- कामकाजाचे मापदंड सुधारू न शकलेल्यांना वेतनवाढ नको
- कामाचे मूल्यांकन ‘चांगल्या’वरून ‘अतिशय चांगले’ असे केले जावे
- नोकरीतली प्रगती कर्मचार्‍यांच्या कामगिरीशी जोडा
- घरभाडे भत्त्याची सांगड महागाई भत्त्याशी घाला

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close