तामिळनाडूमध्ये पावसाचं थैमान कायम, शाळा-कॉलेज बंद

November 23, 2015 4:12 PM0 commentsViews:

tamilnadu_flood23 नोव्हेंबर : तामिळनाडूमध्ये पावसाचं थैमान कायम आहे. काहीशा विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा तामिळनाडू आणि पाँडिचेरीला झोडपलंय. चेन्नईतली शाळा आणि कॉलेजेस आज सुरू होणार होती. पण पावसाच्या तडाख्यामुळे ती बंद ठेवण्यात आली आहे. येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. तामिळनाडूत गेल्या आठवडाभरापासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे हजारो लोक विस्थापित झालेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पावसामुळे आतापर्यंत 169 जणांचा मृत्यू झालाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close