नागपुरात गुंडांनी आई आणि मुलीला गाडीवरुन पाडलं, आईचा मृत्यू

November 24, 2015 1:48 PM0 commentsViews:

nagpur_crime_makade24 नोव्हेंबर : नागपूरमध्ये छेडछाडीच्या प्रकरणात एका तरूण मुलीच्या आईला जीव गमवावा लागला. विशाखा माकडे या तरुणीचा
पाठलाग करणार्‍या तरुणांनी तिच्या गाडीला धक्का मारला. या धक्क्यामुळे तिची आई सुनीता माकडे गाडीवरून पडल्या आणि त्यांच्या मेंदूला जबर मार लागला. यात त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणाची आपण पुरावे दिले आहेत, या मुलांना ओळखायला तयार आहोत. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज देण्यात आलंय. तरीही पोलिसांनी अजूनही कारवाई केलेली नाही असा आरोप पीडित विशाखाने केलाय. या तरुणांना पकडून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणीही विशाखानं केलीये.

नेमकं काय घडलं ?

नेमकं काय घडलं त्यादिवशी त्यातली काही दृश्यं सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाली आहेत. 14 तारखेला कन्हानहून रामटेकला जाण्यासाठी विशाखा माकडे आणि तिची आई सुनिता मोपेडवरुन निघाले होते. मात्र, कन्हानपासून एका बाईकवर तीन तरुणांनी तिचा पाठलाग सुरू केला. कधी बाईक मागे, तर कधी पुढे असा 40 ते 45 मिनीटं प्रकार सुरू होता.

त्यानंतर मनसरला विशाखा थांबली. तिला वाटलं हे तरुण निघून गेले असतील. पण ते तरुण पुन्हा पाठलाग करु लागले. शेवटी मनसरच्या राममंदिराजवळ या तरुणांनी विशाखाच्या गाडीला डॅश दिली. विशाखाची आई खाली कोसळली आणि ते तरुण तिथून फरार झालेत.

विशाखाची आई जखमी अवस्थेत 15 ते 20 मिनिटं रस्त्यावर पडली होती. शेवटी काही तरुण पुढे आले ऑटो थांबवला आणि जखमी सुनीता माकडे यांना रामटेकच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close