देवीसिंग शेखावत अडचणीत

February 10, 2010 2:20 PM0 commentsViews: 3

10 फेब्रुवारीकाँग्रेसचे माजी आमदार डॉ. देवीसिंग शेखावत चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दर्यापूर तालुक्यातील चंद्रपूरचे शेतकरी किशोर बनसोड यांनी शेखावत यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्यात शेखावत यांच्यासह 7 जणांनी दोन एकर शेत हडपल्याचा दावा, किशोर बनसोड यांनी केला होता. दोन्ही बाजूंनी तपास केला असता, किशोर यांचा दावा खरा असल्याचे लक्षात आले आहे. या जमिनीच्या नोंदणीचे फेरफार रद्द करण्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी दिला आहे.

close