तुरुंगातच कैद्याची पार्टी, काजू-बदामचा चकणा आणि मटणाचा बेत !

November 24, 2015 2:30 PM0 commentsViews:

KOL TURUNG party24 नोव्हेंबर : तुरुंगात शिक्षा भोगण्यासाठी धाडलं जातं हे खोटं ठरवणारी एक व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृहात चक्क कैद्यांची तुरुंगातच पार्टी केली असल्याचं समोर आलंय. हे कैदी दारू पितायत आणि गांजा ओढातायत. एवढंच नाहीतर बदाम आणि काजूचा चकणा आणि मटणाचा बेत या कैद्यांसाठी आहे.

या प्रकारामुळे कळंबा कारागृहाच्या बेजबाबदार कारभाराचा प्रश्न ऐरणीवर आलाय. कैद्यांची ही मजा, पार्टी कुणाच्या जीवावर सुरू आहे ? कैद्यांना दारुच्या बाटल्या, गांजा तुरुंगात कुणी आणून दिल्या, जेवणासाठी मटण कसं आणलं हाही प्रश्नच आहे. ही व्हिडिओ क्लीप जामिनावर बाहेर आलेल्या कैद्यानं सामाजिक संस्थेला दिली असल्याचं कळतंय. पण, कळंबा कारागृह प्रशासनाच्या कारभारावर यामुळे ताशेरे ओढले जात आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close