आमिरचं देशावर प्रेम नसेल तर पाकिस्तानात चालतं व्हावं -कदम

November 24, 2015 5:31 PM0 commentsViews:

ramdas kadam on amir24 नोव्हेंबर : आमिर खानच्या वक्तव्यावर शिवसेनेनं सडकून टीका केलीये. आमिर खानचं या देशावर प्रेम नसेल तर त्याने पाकिस्तानात चालतं व्हावं असा इशाराही रामदास कदम यांनी दिला. तसंच आमिर खानच वक्तव्य देशद्रोही आहे का हेही तपासन्याचे आदेश पोलिसांना दिल्याचं कदम यांनी सांगितलं.

देशात वाढत्या असहिष्णुतेमुळे माझ्या कुटुंबाला देशात राहायची भीती वाटते, माझी बायको किरण राव हिला मुलांना घेऊन परदेशात जाऊन राहावंस वाटत होतं तसं तिने बोलूनही दाखवलं, असं वक्तव्य आमिर खानने केल्यामुळे एकच वाद निर्माण झालाय. भाजपसह बॉलिवूडमधूनही आमिरच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनं आपल्या स्टाईलने उत्तर दिलंय.
अभिनेता दिलीप कुमार यांच्या पासून शाहरुख खान, आमिर खान अश्या अनेकांना आम्ही प्रेम दिलं, मात्र त्यांच्याकडून होणारी वक्तव्य एकूण आम्हाला सापला दूध पाजल्याचं पश्चाताप होत असल्याची खळबळजनक प्रतिक्रिया शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिली. रामदास कदम एवढ्यावरच थांबले नाही. आमिर खानचं या देशावर प्रेम नसेल तर त्याने पाकिस्तानात चालतं व्हावं असा इशाराही रामदास कदम यांनी दिला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close