शिवसेना साजरी करणार सत्तेतली वर्षपूर्ती

November 24, 2015 6:04 PM0 commentsViews:

Shiv Sena MLA's24 नोव्हेंबर : भाजपसोबत पुन्हा एकदा युती करून शिवसेना सत्तेत सहभागी झाली. आता शिवसेना सत्तेतली वर्षपूर्ती साजरी करणार आहे. सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेला येत्या 5 डिसेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे.

त्यानिमित्ताने शिवसेना त्यांच्या सर्व मंत्र्यांच्या कामांचा अहवाल सादर करणार आहे. सर्व दहा मंत्र्यांचा अहवाल एकत्रित प्रकाशित केला जाणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड़यात मुंबईत हा कार्यक्रम आहे.

विशेष म्हणजे भाजपसोबत युती करण्यासाठी शिवसेनेनं नकार देत विरोधी बाकावर विराजमान झाली होती. मात्र, भाजपने घेतला राष्ट्रवादीचा पाठिंबा जास्त दिवस टिकू शकला नाही. अखेर शिवसेनेनं भाजपसोबत युती करत सत्तेत आली. तब्बल 15 वर्षांनंतर सेना भाजपसोबत सत्तेत आली. त्यामुळेच आता भाजपपाठोपाठ शिवसेना वर्षपूर्ती साजरी करणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close