आरे कॉलनीत डेब्रीज डंपिंग

February 10, 2010 2:44 PM0 commentsViews: 21

10 फेब्रुवारीदुग्धविकास विभागाच्या अधिकारातील आरे कॉलनीतील 3 हजार एकरहून अधिक जमिनीवर मनमानीपणे मुंबईतील डेब्रीजचे डंपिंग होत आहे. राज्य सरकारच्या परवानगीविना आरेच्या सीईओंनी ही डंपिंगची परवानगी दिली आहे. या प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याचा ठपका आयुक्तांनी दिलेल्या अहवालात ठेवला आहे. ना विकास झोनमधील या कॉलनीतील भ्रष्टाचाराच्या या प्रकरणावर कारवाई करण्याची सूचनाही या अहवालात दिली आहे. पण प्रत्यक्षात यावर काहीही कारवाई होताना दिसत नाही.जुन्या इमारतींचे डेब्रीज, माती आरे कॉलनी परिसरात टाकण्यासाठी बांधकाम ठेकेदारांकडून, मुख्य कार्यकारी अधिकारी शेलटकर यांनी प्रति ट्रक 800 रूपये घेतल्याचा ठपकाही यात ठेवण्यात आला आहे. ज्या ठिकाणी डंपिंग झाले ती जागा दुग्धविकास खात्याच्या मालकीची आहे. पण डंपिंग करण्यापूर्वी दुग्धविकास मंत्र्यांपासून वस्तुस्थिती लपवल्याचे अहवालात म्हटले आहे.

close