तुमचा अमिताभ …आमचा शाहरुख!

February 11, 2010 7:57 AM0 commentsViews: 13

11 फेब्रुवारीशाहरुख खान विरोधाचे शिवसेनेचे आंदोलन टीपेला पोहोचले असताना आता या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाग घेतला आहे.शाहरुख खान प्रकरणावर शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. शाहरुखचेच निकष लावायचे असतील तर मग अमिताभ बच्चननेही माफी मागायला पाहिजे, असे राज यांनी म्हटले आहे. राज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मनसेची याबाबत भूमिका स्पष्ट केली. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या 'अमन की आशा' कार्यक्रमात पाकिस्तानी कलाकारांसोबत बच्चन गाणे गातात. ते सेनेला दिसत नाही का? अमिताभ बच्चन यांनी ऑस्ट्रेलियात भारतीयांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ ऑस्ट्रेलियाचा पुरस्कार नाकारला. मग अमिताभ पाकिस्तानच्या कलाकारांसोबत का गातात? हा अमिताभ यांचा दुट्टपीपणा आहे. शाहरुखला वेगळा न्याय आणि अमिताभला वेगळा न्याय का लावला जातोय? असे सवालही राज यांनी उपस्थित केले आहेत.धास्ती कायम…'माय नेम इज खान'च्या रिलीजसाठी थिएटर्सना सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. पण थिएटर मालकांना मात्र अजूनही सुरक्षेची खात्री वाटत नाही. सिनेमा उद्या रिलीज होणार असला तरी अजूनही तिकीट काऊंटर बुकिंगसाठी उघडण्यात आलेली नाहीत. मुंबईत फक्त आयनॉक्स थिएटरमध्ये या सिनेमाचे बुकिंग सुरू आहे.सांगलीत निदर्शनेसांगलीमध्ये शिवसैनिकांनी 'माय नेम इज खान'विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. सांगलीतील मल्टीप्लेक्समध्ये ही निदर्शने करण्यात आली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शाहरुखची पोस्टर्स जाळली. रत्नागिरीतही शिवसैनिकांनी निदर्शने केली. त्यांनी शाहरुखच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. याप्रकरणी पोलिसांनी 20 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.धरपकड सुरूचदरम्यान आंदोलन करणार्‍या 1 हजार 895 शिवसैनिकांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. 'माय नेम इज खान' उद्या रिलीज होत असल्याने पोलीसांचे धडपकड सत्र सुरुच आहे.आरपीआयचे समर्थनशाहरुख खानच्या समर्थनार्थ आणि शिवसेनेच्या विरोधात घोषणा देणार्‍या आरपीयआयच्या 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. कल्याणी नगर येथील गोल्ड ऍडलॅब्जसमोर हे कार्यकर्ते घोषणा देत होते. शाहरुखच्या सिनेमाला आरपीआयचे कार्यकर्ते संरक्षण देतील, अशी घोषणा कालच रामदास आठवले यांनी केली होती. शाहरुखला चिंतामुंबईत हा वाद सुरू असताना शाहरुख खानच्या 'माय नेम इज खान'चा प्रीमियर अबू धाबीत पार पडला. शाहरुख त्यासाठी स्वतः उपस्थित होता. शिवसेनेच्या आंदोलनावर शाहरुखने चिंता व्यक्त केली आहे. पण परिस्थिती सुधारेल आणि सर्व काही सुरळीत होईल, अशी आशाही त्याने व्यक्त केली आहे.

close