चार कोटी खर्चून तो बनला तोतया अधिकारी, अखेर जेरबंदच !

November 24, 2015 8:19 PM0 commentsViews:

pune_fake officer24 नोव्हेंबर : केंद्र सरकारच्या सल्लागार समितीचा सदस्य असल्याच भासवून आणि गाडीला लाल दिवा लावून फिरणार्‍या तोतया अधिकार्‍याला गुन्हे शाखेने अटक केलीये. विशाल ओंंबळे असं या तोतया अधिकार्‍याचं नाव आहे.

या तोतयाने अनेक कंपन्यांकडून कारवाईचा धाक दाखवत कोट्यवधी रुपये उकळल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. यासाठी त्यांने महागड्या गाड्या घेतल्या आणि पुणे-मुंबईमध्ये पंचतारांकित हॉटेलातच मुक्काम ठोकला.

या सगळ्या खर्चापोटी त्याने तब्बल चार कोटी रुपये खर्च केले असल्याचं तपासात समोर आलंय. नागरिकांंची अशी फसवणूक झाली असेल तर त्यांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close