‘पिंगा’ गाणं काढून टाका, पेशव्यांच्या वंशजांची मागणी

November 24, 2015 8:51 PM1 commentViews:

pinga_song24 नोव्हेंबर : ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमा रिलीज होण्याआधीच वादात सापडला आहे तो ‘पिंगा’ या गाण्यामुळे. आता या मुद्दयावरून बाजीराव पेशव्यांच्या वंशजांनीच संजय लीला भन्सालींना लक्ष्य केलंय. हे गाणं सिनेमातून काढून टाकावं अशी मागणी पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवे यांनी केलीये.

काशीबाई आणि मस्तानी या राजघरान्यातल्या कुलिन स्त्रिया सिनेमात दाखवलेल्या पेहरावात पिंगा घालणं इतिहासाला धरून नाही अशी प्रतिक्रिया उदयसिंह पेशवे यांनी दिली आहे. संजय लीला भन्साली यांनी सिनेमा बनवण्याआधी चर्चा केली तेव्हा पिंगा गाण्याबद्दल कल्पना दिली नाही असंही त्यांनी सांगितलं. पेशव्यांचा पराक्रम दाखवू अशी ग्वाही दिली होती. सिनेमा पाहायला आम्हीही उत्सुक आहोत पण ‘पिंगा’ हे गाणं सिनेमातून वगळण्यात यावं अशी मागणी आपण सरकार आणि सेन्सॉर बोर्डकडे करणार आहोत असं उदयसिंह आणि जयमंगला देवी यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा - …म्हणून बाजीराव-मस्तानी !,बाजीरावांच्या मृत्यूनंतर मस्तानीने केली होती आत्महत्या

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Meena Paes

    Bhansalila itihasashi kaahich denna ghenna nahi.Tyachi priority aahe glamour cash karanna.

close