मुंबई निवडणुकीनंतर मध्यावधी निवडणुका, पवारांचे भाकित

November 25, 2015 1:52 PM0 commentsViews:

pawar_on_bjp_news25 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सेना-भाजप युतीत पुन्हा काडी टाकण्याचा प्रयत्न केलाय. मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यावर राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असं भाकित शरद पवार यांनी व्यक्त केलंय. ते कराडमध्ये बोलत होते.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर जर विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि सरकारमध्ये काही बदल झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही असं पवारांनी म्हटलंय. याआधीही पवारांनी मध्यावधी निवडणुकीचे भाकित वर्तवले होते. विशेष म्हणजे, बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचा झालेला दारुण पराभवामुळे भाजपचं खच्चीकरण झालंय. राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरूच आहे. बिहारमधल्या भाजपच्या पराभवावर शिवसेनेनं महाराष्ट्रात जर आज निवडणुका झाल्या तर हीच परिस्थिती निर्माण होऊ शकते असा विश्वास व्यक्त केला होता. आज शरद पवारांनी यात आणखी भर घातली. मात्र, शरद पवारांनी जर भाकित वर्तवले म्हणजे पाच वर्षांपर्यंत काहीही होणार नाही. सरकार स्थिर आहे अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close