राहुल गांधींच्या सुट्टीचं रहस्य उलगडलं, बँकॉकसह 4 देशांची केली होती सफर !

November 25, 2015 2:17 PM0 commentsViews:

rahul gandhi_425 नोव्हेंबर : ऐन बजेट अधिवेशनादरम्यान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सुट्टीवर गेल्यामुळे काँग्रेसला टीकेला सामोरं जावं लागलं होतं. पण तरीही काँग्रेसने राहुल गांधी कुठे गेले हे कळू दिलं नाही. पण आता या सुट्टीचं रहस्य उलगडलंय. राहुल गांधी चार देशांच्या वैयक्तिक दौर्‍यावर गेले होते. त्यात बँकॉक, कम्बोडिया, म्यानमार आणि व्हिएतनाम या देशांमध्ये गेले होते.

16 फेब्रुवारी 2015 ला राहुल दिल्लीवरून बँकॉकला गेले तिथे एक दिवसांचा मुक्काम केला.17 फेब्रुवारीला बँकॉकहून कंम्बोडियाची राजधानी नॉमपेन्हला गेले. तिथे 11 दिवस मुक्काम ठोकला. त्यानंतर 28 तारखेला परत बँकॉक आणि एक दिवसानंतर म्यानमारला गेले. तिथे ते 21 दिवस होते. 22 मार्चला ते बँकॉकला आले आणि 9 दिवस राहिले. 31 मार्चला ते व्हिएतनामला गेले आणि 12 दिवस राहिले 12 एप्रिलला ते बँकॉकला परतले आणि चार दिवस राहिले. यानंतर 16 एप्रिलला ते दिल्लीत परत आले. असंही कळतंय की, या देशांच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी ते गेले होते. त्यांचा जीवलग मित्र समीर शर्मा त्यांच्याबरोबर होता. समीर हा राजीव गांधींचे मित्र आणि राज्यसभेचे खासदार सतीश शर्मा यांचे पुत्र आहेत. त्यांच्याबरोबर स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे 2 सुरक्षारक्षकही होते. कुणी कुठे जावं हा वैयक्तिक प्रश्न आहे, पण फेब्रुवारीमध्ये ऐन बजेट अधिवेशनादरम्यान राहुल गांधी सुट्टीवर गेले, आणि परिणामी राहुल गांधींवर भरपूर टीका झाली होती.

राहुल कुठे आणि कधी गेले होते ?
– 16 फेब्रुवारी ते 16 एप्रिल सुट्टीवर होते
– 16 फेब्रुवारीला नवी दिल्लीहून बँकॉकला गेले
– 17 तारखेला व्हिएतनामची राजधानी नॉम पेन्हला गेले, तिथे 11 दिवस राहिले
– 28 तारखेला ते पुन्हा बँकॉकला आले, आणि तिथून ते म्यानमारमध्ये गेले
– म्यानमारमध्ये ते 21 दिवस होते, आणि 22 मार्चला त्यांनी पुन्हा बँकॉक गाठलं
– बँकॉकमध्ये 9 दिवस मुक्काम केला
– 31 मार्चला पुन्हा व्हिएतनामसाठी रवाना झाले, तिथे 12 दिवस राहिले
– 12 एप्रिलला ते बँकॉकमध्ये परतले, तिथे 4 दिवस राहिले आणि मग 16 तारखेला नवी दिल्लीत परतले

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close