अमेरिकन नागरिक ताब्यात

February 11, 2010 8:48 AM0 commentsViews: 1

11 फेब्रुवारीदिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर एका अमेरिकन नागरिकाला ताब्यात घेण्यात आले आहे. विन्स्टन मार्शल असे त्याचे नाव आहे. त्याच्याजवळ चाकू आणि काही कागदपत्रे सापडल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी डेव्हिड हेडली प्रमाणेच मार्शलनेही भारतातल्या अनेक ठिकाणांना भेट दिल्याची माहिती मिळाली आहे. मार्शल दिल्लीहून दोहामार्गे न्यूयॉर्कला जाण्याच्या तयारीत होता. गुप्तचर संस्थांच्या माहितीनंतर CISFने मार्शलला ताब्यात घेतले. गुप्तचर विभाग आणि दिल्ली पोलिसांची टीम मार्शलची चौकशी करत आहे. मार्शलकडे बांगलादेश, भारत आणि पाकिस्तानचा टूरिस्ट व्हिसा असल्याचे समजते.

close