दुष्काळाच्या झळा, सरपंचानेच सोडलं गाव आणि गाठली मुंबई !

November 25, 2015 4:09 PM0 commentsViews:

drought_latur_sarpancha25 नोव्हेंबर : दुष्काळाची दाहकता आणि टंचाईची झळ आता ग्रामीण भागातल्या लोकांना तीव्रतेने जाणवू लागलीय. ग्रामीण भागातल्या अनेकांनी तर भाकरीच्या शोधात गाव सोडून शहराकडे धाव घेतली आहे. इतकंच काय लातूर जिल्ह्यातल्या वांजरखेडा गावातल्या महिला सरपंचाने देखील दुष्काळाच्या भीतीने चक्क गाव सोडलंय.

पार्वतीबाई हाळे या वांजरखेड गावच्या सरपंच. घरची परिस्थिती अगदी बेताचीच आणि गावात रोजगार उपलब्ध नसल्यानं त्यांनी मुंबई गाठलीय. त्यामुळे दुष्काळाची दाहकता किती गंभीर झालीय हे यावरून स्पष्ट होतंय.

आता गावात सरपंचच नसल्याने गावातल्या समस्या जैसे थे आहेत. आता या गावाचं काय होणार ही चिंता ग्रामस्थांना भेडसाऊ लागलीय. दोन गावांची मिळून या गावात ग्रुप ग्रामपंचायत आहे. सध्या या गावाला कुणी वालीच उरला नाही. गेल्या तीन वर्षांपासून कमी पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close