इथं अख्ख गाव रोजगार हमी योजनेच्या कामावर !

November 25, 2015 4:17 PM0 commentsViews:

dokewadi_gao325 नोव्हेंबर : लातूरच्या वांजरखेडा गावच्या सरपंचांनी गाव सोडल्याची घटना घडलीये. लातूरला लागूनच असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गावांची काही वेगळी परिस्थिती नाहीय. इथं डोकेवाडी हे अख्ख गाव पोटासाठी रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करतंय.

दुष्काळाचं संकट हे दिवसेंदिवस तीव्र होत चाललंय. उस्मानाबाद जिल्यात तर दुष्काळ आता पराकोटीला जावून पोहचलाय. पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकरी, शेतमजूर अक्षरशः भटकंती करताना दिसतोय. अनेक शेतकर्‍यांनी या दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. तर अनेक जण आपली गावं सोडून विस्तापित झाली आहे. भूम तालुक्यातील डोकेवाडी हे अख्ख गाव पोटासाठी रोजगार हमी योजनेच्या कामावरती काम करतंय. दुदैर्वाची बाब म्हणजे या कामावर महिला, आणि वृद्धांनाही रोजगार हमी योजनेवर काम करावं लागतंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close