जीएसटी विधेयक हे देशहिताचं, मंजुरीसाठी सहकार्य करा -मोदी

November 25, 2015 5:47 PM0 commentsViews:

pm modi3325 नोव्हेंबर : उद्यापासून सुरू होणार्‍या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरू आहे. जीएसटी विधेयक हे देशहिताचं आहे, ते मंजूर करण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून जीएसटी आणि भूमिअधिग्रहन विधेयक ही महत्वाची विधेयकं मांडण्यात येणार आहेत. आगामी हिवाळी अधिवेशनानिमित्त ही बैठक आहे. या अधिवेशनात जीएसटी विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे, आणि सध्या विरोधकांचं मन वळवण्याचा सरकार प्रयत्न करतंय. या बैठकीआधी भाजपच्या मंत्र्यांचीही बैठक झाली. अधिवेशनाच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली. असहिष्णुतेच्या मुद्द्यावर चर्चेसाठी लोकसभेतले काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दोन्ही सभागृहात नोटीस दिली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close