…आणि राज ठाकरेंनी काढला पहिला सेल्फी !

November 25, 2015 8:07 PM0 commentsViews:

25 नोव्हेंबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत अनेकांनी आजपर्यंत सेल्फी काढल्या आहेत. पण त्यांनी आजपर्यंत स्वत: एकही सेल्फी कधी काढला नव्हता. तो योग जुळून आला सेल्फी या नाटकाच्या टीमसोबत.

सध्या सेल्फी हे नाटक जोरदार गाजतंय. याच नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी राज ठाकरे गेले होते. प्रयोग आटोपल्यानंतर या सेल्फीच्या टीम सोबत राज यांच्या गप्पा रंगल्या. सध्याच्या प्रचलीत जगण्यावर हसत खेळत भाष्य करणार्‍या या टीमनं राज यांनी काही सांगावं असा आग्रह धरला.

पण बोलण्यापेक्षा आपण सेल्फी काढू असं म्हणत राज यांनी चक्क आपला मोबाईल काढला आणि सर्व कलाकार पटकन राज यांच्या मागे गोळा झाले. विशेष म्हणजे ही माझ्या आयुष्यात मी काढलेली ही पहिली सेल्फी आहे असं राज यांनी सांगताच कलाकारांना आनंदाचा धक्काच बसला. एकंदरीत राज ठाकरेंचाही आता सेल्फी काढण्याचा श्रीगणेशा झाला तो ही सेल्फीच्या रंगभूमीवरंच.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close