पुण्यात विद्यार्थ्यांना डांबले

February 11, 2010 9:02 AM0 commentsViews: 2

11 फेब्रुवारीशाळेतील चार दंगेखोर मुलांना शिक्षा करण्यासाठी संपूर्ण वर्गालाच डांबून ठेवण्याची घटना पुण्यात घडली. टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हा प्रकार झाला. विशेष म्हणजे मुख्याध्यापकांनीही या प्रकाराचे समर्थन केले आहे. नववीतील काही विद्यार्थी शाळेतील साहित्याची तोडफोड करीत होते. त्यासाठी त्यांच्या पालकांनी शाळेत यावे, असे सांगूनही या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत येत नव्हते. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर मुख्याध्यापकांनी या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण वर्गालाच जवळपास 3 तास शाळेतच डांबून ठेवले. रात्र झाली, तरी मुले घरी का आली नाहीत, या विचाराने पालक धास्तावले होते. दरम्यान भारतीय विद्यार्थी सेनेला याची कुणकुण लागताच ते पालकांसह शाळेवर धडकले. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले.

close