आज सेक्युलर शब्दाचा सर्वाधिक दुरुपयोग -राजनाथ सिंह

November 26, 2015 2:19 PM0 commentsViews:

rajnath_singh426 नोव्हेंबर :  भारतीय राजकारणात सगळ्यात जास्त दुरुपयोग सेक्युलर शब्दाचा झाला आहे अशी टीका गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलीये. आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संविधानावर लोकसभेत चर्चा झाली. त्यावेळेला त्यांनी हे मत व्यक्त केलंय.

सेक्युलारिझमचा खरा अर्थ पंथनिरपेक्ष होतो, धर्मनिरपेक्ष नाही असंही त्यांनी म्हटलंय. तसंच राजनाथ सिंह यांनी अमिर खानलाही अप्रत्यक्षपणे टोला मारलाय. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही देशासाठी काम करताना खूप त्रास झाला. पण त्यांनीही कधीही देश सोडून जाण्याची भाषा केली नाही असा टोमणा राजनाथ सिंह यांनी आमिर खानला लगावलाय.

असहिष्णुतेच्या मुद्यावरून अमिरखाने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यापार्श्वभूमीवरच राजनाथ सिंहाचं हे विधान महत्वाचं मानलं जातंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close