राज्यघटनेत योगदान न देणारे आज चर्चा करताय, हेच मोठ हास्यास्पद -सोनिया गांधी

November 26, 2015 2:49 PM0 commentsViews:

soniya gandhi426 नोव्हेंबर : भारतीय राज्यघटनेनं गेली कित्येक दशक आपल्याला सर्वाधिकार दिले ती राज्यघटना धोक्यात आली आहे. राज्यघटनेच्या निर्मितीत कोणतंही योगदान दिलं नाही ती लोकं आज राज्यघटनेवर चर्चा करताय हेच हास्यास्पद आहे अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संविधानावर लोकसभेत चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय राजकारणात सगळ्यांत जास्त दुरुपयोग सेक्युलर शब्दाचा झाला आहे अशी टीका केली. त्यानंतर सोनिया गांधींनी राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर दिलं. आज एक आनंदाचा दिवस आणि दुखाचा दिवसही आहे. कारण, ज्या, भारतीय राज्यघटनेनं गेली कित्येक दशक आपल्याला सर्वाधिकार दिले ती राज्यघटना धोक्यात आली आहे. राज्यघटनेच्या राज्यघटनेच्या तत्वांवर जाणूनबुजून घाला घातला जातोय असा आरोप सोनियांनी केला.

तसंच गेल्या काही महिन्यांत ज्या काही घटना घडल्या आहेत. त्या पूर्णपणे संविधानाची पायमल्ली करणार्‍या आहे. ज्या लोकांना राज्यघटनेत आस्था राहिलेली नाही. राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये कोणतंही योगदान नाही. ती लोकं आज राज्यघटनेवर चर्चा करत आहे हीच मोठी खेदाची बाब असून या पेक्षा मोठा विनोद असू शकत नाही अशी घणाघाती टीकाही सोनिया गांधींनी केलीये.एका प्रकार सोनियांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या सर्व नेत्यांना टोला लगावला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close